FROZEN.....
विविध विषया संदर्भात
झालेल्या चर्चा, उहापोह, लोकांच्या प्रतिक्रिया यातून लक्षात आले की
समाजात, बेडरूम आणि त्यासंबंधी असणारे प्रश्न यावर खुलेपणाने चर्चा कमी
होतात, त्यामध्ये बरेच अज्ञान आहे, गैरसमजुती आहेत, नको इतका संकोच
आहे. हा प्रश्न तरुणवयापासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्वाना जाणवतो. खूपदा
याविषयात काही समस्या असू शकते असं न वाटल्यामुळे, किंवा अनेक
गैरसमजुती, झाकून ठेवायची वृत्ती आणि अज्ञान यामुळे लोक ही गोष्ट लपवत
राहतात त्यामुळे समस्या सोडवण्या ऐवजी वाढत राहतात. हि कोंडी कुठेतरी
फोडावी यासाठी या विषयावर लेखन करावं असं वाटलं आणि ते मला
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक सारखं माध्यम मिळालं.कोणत्याही
प्रॉब्लेम पासून मुक्तता हवी असेल तर त्याचा सोपा उपाय म्हणजे मुळात
समस्या आहे हे मान्य करणं !! मात्र या नाजूक विषयावर समाजात फारसं
बोललं जातं नाही, पुरेशी वैज्ञानिक माहिती मिळत नाही. मात्र गैरसमज
होतील अशी माहिती कुठेही सहज प्राप्त असते जसं कि पिवळी पुस्तकं,ब्लू
फिल्म्स, चावट आणि अश्लील जोक्स,हे विविध प्रकारे उपलब्ध आहे मात्र
त्यामध्ये मनाशी असणारा संबंध कुठेही अधोरेखित नाही. म्हणूनच माझ्या
लेखामध्ये मी याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. यामध्ये जोडप्यांमध्ये
असणाऱ्या समस्या, सहजपणाने केले जाऊ शकतील असे उपाय,