निलेश नावाच्या एका व्रात्य शाळकरी मुलाच्या खोडकरपणामुळे त्याच्यावर काय प्रसंग ओढवतात, हे यातील तीन गोष्टींमध्ये वाचता येईल.
१. निल्लु आणि बिल्लु : थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला 'बिल्लु'ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या सुधारशाळेत पाठविण्याचे ठरवितात. अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलून जाते. त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ती विचित्र घटना काय? ते जाणण्यासाठी वाचा ही कथा...
२. बिल्लु आणि रोहू : निलेशच्या काही दोष नसताना त्याच्यावर चोरीचा आळ येतो आणि हरवलेली वस्तू शोधण्याच्या प्रयत्नात तो एका तलावात पडतो....