'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' १९२५ साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नव्वद वर्षांपूर्वी रोवलेल्या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. केवळ देशातच नाही, तर जिथे जिथे म्हणून भारतीय आहेत, त्या त्या देशांमध्ये संघ कार्यरत आहेच. इतकेच नाही, तर परदेशातील भारतीयांना आपल्या देशाशी, संस्कृतीशी घट्टपणे जोडून ठेवणारी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ही संघटना नाही, तर परंपरा बनलेली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील हे पुस्तक ज्येष्ठ...